Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SAGAR PAWAR

Abstract

2  

SAGAR PAWAR

Abstract

"लोकलवास"

"लोकलवास"

1 min
359


डब्याडब्यांत झुंबड..चढण्याची शर्यत..

उसासलेल्या चेहऱ्यांची आसुसलेली श्वापद..

लटकणाऱ्या जथ्यांची जीव नसलेली हाड..

बसलेला शहाणा नि उभारलेली सुळके..


गच्चं कळपात आपलेपण शोधणारे ती,तो..

श्वासांच्या वाढीव पगाराचा रंगील खेळ..

गुदमरतोय श्वास याचा, त्याच्या छाताडात..

नाकावाटे मेंदूत जाऊन छी थू करणारे काही..

काही सरळमार्गे हृदयात शिरणारी स्पंदने..


भोंग्याच्या, रुळाच्या संगीताने भिनणारे इअरफोन..

हलत्या बाहुल्यांचा घडतोय नागीण डान्स..

जैविक भजनाचा सूर वजा आरोळी हाक..

नाहीतर भौतिक जीवनाची जगण्याची प्रश्नावळ..


जिभा जीभांवर रेंगाळत तळमळतोय राजकीय पक्ष..

गंतव्यस्थानाची वाट पाहणाऱ्या हळव्या दगडाचा भोग..

वासात वास मिसळतोय चायनीज भेळीसारखा..

तो नसतो नाकाला अत्तरी सुगंध केव्हा प्रेतासारखा दुर्गंध..

ज्या नव्या वासाची श्वासांना झालेली सवय तो "लोकलवास"



Rate this content
Log in

More marathi poem from SAGAR PAWAR

Similar marathi poem from Abstract