लग्नानंतर...
लग्नानंतर...
बंद झाले माझ्यासाठी कायमचे काही दरवाजे जरी
वाटचाल माझी थांबणार नाही
देईन धडका बेभान होऊन द्वारांवरी त्या
जोपर्यंत तो, उघडल्याची निशाणी देणार नाही
मारले या फाटलेल्या काळजाला किती जरी रफ्फु
अश्रूरुपी रक्त सांडायचे थांबणार नाही
कितीही यातना द्या या मनाला
तुझ्यासाठी झुरायचे मात्र ते कधीच विसरणार नाही
किती केले सायास तुला मिळवण्यासाठी
फळाला मात्र काहीच आले नाही
झालीस आता तू दुसऱ्याची जरी
माझ्या प्रेमाची सर त्याला नाही
कितीही झुरलो आता तुझ्यासाठी जरी
तुला काही एक जाणवणार नाही
तू भोगत असलेलं सुख
मला मात्र कधीच पचणार
नाही
जपून राहा जरा, माझ्यासाठी नाही जमले जरी
त्याच्याशिवाय तरी, आता तुला पर्याय नाही
खूप ठिकाणी स्थान निर्माण केलंयस आता तू तुझं
माझ्यासाठी मेली असलीस आता तू जरी
त्याला मात्र तू, कधीच पुरणार नाहीस
आपल्या नात्यात पडला आता मायेचा दुष्काळ जरी
तुला मात्र मायेची कमी, कधीच जाणवणार नाही
मी मात्र तडफडेन तुझ्या मायेसाठी
तुझ्या मायेचा पाऊस मात्र
माझा दुष्काळ कधीच मिटवणार नाही
काढतोय दिवस "हेही दिवस जातील" असं म्हणत
जसे तेही दिवस गेले आपल्या सुखाचे
आपण दोघांनी भोगले ते दिवस जरी
तुला मात्र आता कशाचंच मोल राहिलं नाही