दुरावा
दुरावा
नजरेला नजर भिडणार कधी
सांग ना रुसव्याचा फुत्कार काढून
तू माझ्याशी नडणार कधी
आसवांचा नरम थेंब
तुझ्या गालावर ओघळणार कधी
अन माझ्यातला जबाबदार सखा
तो टिपायला सरसावणार कधी
तुझा लाडीक हात
माझ्या गालावर पडणार कधी
सांग ना तुझा तो चिमटा
माझ्या अंगावर शहारा आणणार कधी
तुझी ती मंजुळ हाक
माझं मन पाघळणार कधी
अन तुझे ते शब्द वेचायला
माझं मन धावणार कधी
तुझ्या त्या फालतुच्या हट्टानी
माझा पारा चढणार कधी
अन तुझ्या त्या केविलवाण्या विनवणीने
माझ्याकडून अलगद तो काढून घेणार कधी
सांग ना ग
तुझा अबोला फुटणार कधी
अन आपलं नात पुन्हा फुलणार कधी
कितीही झुरलो मी आता जरी
शक्य नाहीये आपलं फुलणं या जन्मी तरी
मात्र मनाशी बांध एकच खूणगाठ
पुढच्या जन्मी द्यायचियेस तू मला साथ
मन तीळ तीळ तुटत ग
तुझ्या आठवणीनं क्षणाक्षणाला
वाळवि सारखी छिद्र पडलेत
तुझ्या नुसत्याच मोकळ्या आठवणीनं या मनामनाला
देह म्हणजे पोकळ बांबू झालाय
कधीही फुटेल साध्या ठोकरीतही
जीव मेटाकुटीला आलाय
कारण एकच तुझा दुरावा
पाडून पाऊस तुझ्या मायेचा
देशील ना कधीतरी या बावळ्या मनाला गारवा
