STORYMIRROR

अमोल गिरी

Inspirational

4  

अमोल गिरी

Inspirational

लेकापरिस लेकिने घडवुनि दावले जगास

लेकापरिस लेकिने घडवुनि दावले जगास

1 min
364

अंगाई गीतांची सुरू झाली होती रास

जन्मास आली होती आमुच्या घरी एक परी खास

व्यथा तिच्या मनातल्या आम्ही सांगू कोणास?

लेकापरिस लेकीने घडवुनि दावले जगास...


मुलगी आली जन्मास म्हणुनी रागराग नका करु

आम्हासही जमेल प्रगती आम्हीही करु

आई-बाबांची व्यथा लेकही समजू शकते,

मन तुमचे लेकही वाचु शकते...


तुम्ही आमच्या भावना कधी समजुनी घेतल्या नाही

चूल-मूलपासुनी दुर केलंच नाही

शिकुनी शिक्षण घडेल मी

तुमचं नाव मोठ करेल मी

मुलगी म्हणुनी तुमच्या आली जरी पोटी

एकदिवस नक्की मी होईल तुमची काठी...


कित्येकदा हिणवलंत नकोनकोसं

थोडंतरी मज माझ्या मर्जीने जगू द्या

हृदयी तुमच्या पाझर फुटू द्या

उंच आकाशी मज भरारी घेवू द्या


तुमचे काबाडकष्ट नाही जाऊ देनार मी वाया

माझ्यासाठी करु नकात कोणापुढे गयावया

तुमच्या उदरी मुलगी आली याचा आनंद वाटू द्या

जीवन माझे मजला यथार्थ जगू द्या...


मुलगी झाली म्हणुनी जे लोक हसतील

प्रगती माझी पाहून तेच लोक रडतील

माया पाझरणारे फक्त छत्र मला हवे

मुलगा-मुलगी नको हे हेवेदावे...


बोलणे लोकांचे लावुनी हृदयी

अश्रूत होवु नका ओलंचिंब

डोळे उघडुनि पहा तरी

उदरात तुमच्या "लेक" आली

घेवुनि "लेकाचे" प्रतिबिंब...


व्यथा तिच्या मनातल्या आम्ही सांगू कोणास?

लेकापरिस लेकीने घडवुनि दावले जगास


Rate this content
Log in

More marathi poem from अमोल गिरी

Similar marathi poem from Inspirational