लावणी-- विडा
लावणी-- विडा
रंग महाल खुलला गंss बाई.....
सजला ...पलंग... मखमालीचाsss......
विडा करते तुम्हां पिरतीचा ss गं
विडा देते तुम्हां पिरतीचा.......llधृl
कोवळं पान ss हे....हिरवगारं......
केसरी चुना ...लावते... थोडाफारं ...,.
गुलकंद टाकून... थंडगार...
कात टाकते..केतकीचा...
विडा करते तुम्हां पिरतीचाss गं
विडा देते तुम्हां पिरतीचा.......ll१ll
प्रेमानं घालून ...गुंजपाला......
वरss बडीशेप... सोबतीला...
फोडां ...सुपारी..,लावा.,. अडकीत्याला..
कला राया मी साज s शृंगारं....हो..शृंगार..
नेम धरुन मा जीरते... बाण ..ईष्काचा....
विडा करते तुम्हां पिरतीचाssगं..
विडि देते तुम्हां...पिरतीचा....ll२ll
राया सबुरीनं घ्या..रंग चढू द्या मदनाचा..
दुरावा..सोसूनं..पिसा जीव झाला...
तुम्ही बसा मी बसते डाव्या बाजूला...
सुटला ss,वारा...गारं....गाssर
लुटा खजिनां... हा ...यौवनाचा....
विडा करते तुम्हां पिरतीचा ssगं..
विडा देते तुम्हां...पिरतीचा...ll३ll
हळू हळूचं चावां लागंल चवदारं ..
धुंद ..सुगंध...मोहवणारं....
ओठं लाल चटकदारं...चटकदार..
रंग लुटा.ss हो.. जीवनाचा.....
विडा करते तुम्हां पिरतीचाssगं..
विडा देते तुम्हां... पिरतीचा..ll४ll

