लावणी - मर्जी
लावणी - मर्जी
वाट पाहून जीव हा शिणला, येणार कधी हो राया
मर्जी तुमची सांगा मला मी तुमच्या पडते पायाllधृll
प्रीतीच्या दरबारी पडता पाऊल,
सख्या सजणाची येतीया चाहूल
दिलाच्या देव्हाऱ्यात करील तुमची पूजा
ईष्काच्या रातीला साद घालते मी अशी राया
मर्जी तुमची सांगा मला मी तुमच्या पडते पायाll१ll
ज्वानीच्या अशा रंगात, तुम्ही यावं ढंगात
चाले ठुमकत बाई घुसे कट्यार काळजात
चंद्रकला मी तुमची येई अशी जोमात राया
तुमच्यासाठीच मी साज शृंगार हा केलाया...
मर्जी तुमची सांगा मला मी तुमच्या पडते पायाll२ll
माझ्या या दिलाचे तुम्ही हो दिलदार
लाज येता बाई सोसंना यौवनाचा भार
बाण मारते ईष्काचा मदनाची धुंद चढलिया
अंग माझं शहारी, सबुरीने घ्यावं तुम्ही राया
मर्जी तुमची सांगा मला मी तुमच्या पडते पायाll

