STORYMIRROR

Nilesh Bamne

Tragedy

3  

Nilesh Bamne

Tragedy

कविता

कविता

1 min
223

जाळणाऱ्या, जळणाऱ्या, जाळून घेणाऱ्या आणि

जाळल्या जाणाऱ्या स्त्रियांवर

हल्ली मी कविता लिहीत नाही

याचा अर्थ मी

कोरडा किंवा कोडगा झालेलो नाही...

पण माझं निरीक्षण मला तसं करायला भाग पाडत...

मी स्त्रीला - पुरुषांच्या बरोबरीला

उभं राहिलेलं पाहण्याचं स्वप्न पहिलं होत

पण त्या पुरुष होऊ पाहता आहेत...आज दुर्दैवाने...

शिक्षणाने येणार शहाणपण त्यांच्यात येतच नाही

काही मोजक्या सोडल्या तर...

बाकीच्या आजही...पुरुषांच्या मानसिक गुलाम आहेत...

का कोणास जाणे त्यांनाच नकोय संपूर्ण स्वातंत्र्य...

माझ्या कवितेनं स्वप्न पाहिलं

घराघरात जिजाबाई, आहिल्याबाई आणि

लक्ष्मीबाई जन्माला आल्याच...

पण येथे आज घराघरात जन्माला येता आहेत

खोट्या नायिका चेहऱ्यावर फक्त रंग चढवलेल्या...

मनगटात ताकद नसणाऱ्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy