STORYMIRROR

Amruta shinde

Romance

4  

Amruta shinde

Romance

कुणीतरी आपल्यासाठी...

कुणीतरी आपल्यासाठी...

1 min
215

का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते

कुणीतरी आपल्यासाठी असावे

ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे

आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे

रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे


मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे

उशिर झाला केव्हा तर रुसावे

पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे


केव्हा नटता सावरता आपण

त्याने मनापासुन कौतुक करावे

का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..

कुणीतरी आपल्यासाठी असावे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance