कथा नभ-धरेच्या प्रेमाची
कथा नभ-धरेच्या प्रेमाची
सरेल अुन्हाळा .. पावसाळा येईल
वाट पाहती धरेचे अधिर ते मनं
हिरवी वनराई,हिरवं शिवारं
सुंदर धरा, लेयीलं हिरवा तो साज
निळंभोर आभाळ , निळ्या निळाईचा
कृष्णकांती अंबराचा अथांग तो थाट
प्रेमात पडली .. गुलाबी स्वप्नांत रंगली
अथांगतेवर नभाच्या धरा ती भाळली
नटली …सजली …शृंगारली
अंतरीचे अव्यक्त प्रेमगुज सांगण्या
धरेच्या हृद्यातून शब्दफुल अुमलती
पानंफुलं ती धरेचं प्रेमगीत
गुणगुणत आकाशाकडे झेपावती..
स्विकृती देण्या आपल्या प्रेमाची..
नभाचेही मग आंनदाश्रू बरसती
थेंबा-थेंबानं तो मग ...
मातीचा, कण न् कण स्पर्शितो
धरेचेही मग रोम न् रोम शहारतो
खळाखळत निर्मळ निर्झर वाहती
मयुरही मग हर्षुनी रानभर नाचती
कमळ दलांवर...
स्फटीक मोती हळूवार निजती
आनंदाश्रू नभाचे काळ्यामातीवर
नभ-धरेच्या प्रेमाची कथा गोंदती
नभ-धरेच्या प्रेमाची कथा गोंदती

