क्षणभंगुर जीवन हे
क्षणभंगुर जीवन हे
क्षणभंगुर जीवन हे
नाही उद्याचा भरवसा
मनमुराद आनंद लुटा
नाचा,गा आणि हसा....!!
काय कमवलं,किती कमवल़ं?
नाही कसलाच याला अर्थ
कधीतरी ओळखा दुःख इतरांचे
हाच आहे रे गड्या खरा परमार्थ...!!
नशिबाने मिळाली साथ जरी
वैरी नका होवू माणसांचे
आसुया, द्वेष,राग,मत्सर
सारे दुर्गूण माणसाचे.....!!
कितीही कमावलं तरी माणसा
एक दिवस तुला रस्त्यावर अंघोळ
चार जणांच्या खांद्यावर जातोस
फक्त तीन लाकडांचा मेळ....!!
चार दिवस रडती सारेजण पण
कुणी म्हणती लटकेच माणूस भला
विरहाच्या कक्षेत जरा येऊन पहा
कळेल काय होतंय ते तुला....!!
संपत्तीची हाव सोड माणसा
संतती चांगली निर्माण कर
क्षणभंगुर जीवन सारे
थोडे सदगुणांनी भर......!!
एक दिवस कळेल तुला
खरोखरच माणसाची किंमत
वृध्दापकाळ येता समयी
कुठून आणणार इतकी हिंमत....!!
भलेबुरे सोडून दे रे
कमी ठेव संपत्तीची हाव
कोणा नशिबी काय येईल?
हे आहे का कुणाला ठावं......!!

