क्षण
क्षण


एक क्षण सुखाचा
एक क्षण दु:खाचा
परी तोच क्षण मौल्याचा,
एक क्षण प्रेमाचा
एक क्षण आठवणींचा
पण तोच क्षण हव्यासाचा,
एक क्षण आत्मनिर्भरतेचा
एक क्षण आत्मविश्वासाचा
मात्र तोच क्षण धैर्याचा,
एक क्षण सन्मानाचा
एक क्षण अपमानाचा
परंतु तोच क्षण आदराचा,
एक क्षण वेदनेचा
एक क्षण जखमेचा
परी तोच क्षण वात्सल्याचा