STORYMIRROR

Suhas Wairkar

Inspirational Others

3  

Suhas Wairkar

Inspirational Others

कृतज्ञता पर्यावरणाशी

कृतज्ञता पर्यावरणाशी

1 min
171

कष्ट घेती वृक्षवल्ली देण्या सर्वस्व सदैव तत्पर

घाव घालणे, आगी लावणे सोड मानवा तू सत्वर

मनुजा, अजूनही वेळ गेलेली नाही पर्यावरणाशी कृतज्ञतापूर्वक वाग ।। 

नद्या पाजती जलामृत मातेसम स्तन्यपान करती

सोडून दे मानवा जल प्रदूषण करणे दिन-रात्री

मनुजा, अजूनही वेळ गेलेली नाही पर्यावरणाशी कृतज्ञतापूर्वक वाग ।। 

वायू अविरतपणे देतो प्राणवायू जगविण्या सर्वांचे प्राण

ठेव नियंत्रणात गाड्या, धुरांडी वाचव तुझेच प्राण

मनुजा, अजूनही वेळ गेलेली नाही पर्यावरणाशी कृतज्ञतापूर्वक वाग ।।

सरिता-सागर-भूमी जे जे हवे ते ते सर्वां देती

प्लास्टिक प्रदूषणाने मानवा तू का सर्वां देशी मूठमाती ? 

मनुजा, अजूनही वेळ गेलेली नाही पर्यावरणाशी कृतज्ञतापूर्वक वाग ।।

पर्यावरणीय तापमान वाढले, सागरी वादळे वाढली 

निसर्गाने घरात घुसून सर्व घरे-दारे ओरबडली

मनुजा, अजूनही वेळ गेलेली नाही पर्यावरणाशी कृतज्ञतापूर्वक वाग ।।

थांबव आता स्वार्थासाठी निसर्गाचे सततचे ओरबडणे

निसर्गाकडून ' देणे ' शिकून घे, वाग निसर्गाशी जबाबदारीने

मनुजा, अजूनही वेळ गेलेली नाही पर्यावरणाशी कृतज्ञतापूर्वक वाग ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational