कळी फुलली मनाची
कळी फुलली मनाची
नजरेस येता कळी
देई आनंद मनाला
रंग रुपाने मोहक
देई तृप्तता जीवाला
फुल असते असेच
मन करी आनंदित
पडे विसर दुःखाचा
चोहीकडे सुगंधित
काम असे हे फुलाचे
नित्य आंनद लुटणे
स्वतः काट्यात राहूनी
उद्या माहित कोमेजणे
उद्या कळी उमलता
मन होतील दुजांची
येता विचार मनात
कळी फुलली मनाची

