STORYMIRROR

Aman Shaikh

Abstract

3  

Aman Shaikh

Abstract

खलास

खलास

1 min
182

थोडं पलीकडे बघितलं की आपण खलास,

मग जावं-जावं म्हणून शेवटी नाहीच गेलो

हळूच सळकन उठणारी ही जाणीव,

आपल्याला खलास करते की काय?


करायचं ते राहून गेलं, नको तो फापटपसारा मात्र नेटाने पुढे चालविला.

आता बोलून तरी काय अर्थ उरतो?

करुनच काही अर्थ उरला नाही तर.


पुष्कळ वेळा ओथंबून जाणाऱ्या मनाच्या लाटा अडविल्या,

जर हे शेवट मानलं तर शेवटपर्यंत हेच केलं,

आता मात्र संपूर्ण खलास झालोय.


मग आपण रणरणतं ऊन मागितल, दुष्काळ मागितला. अमरत्व. अभंग माया.

म्हणून माणसातून उठलो?

आणि सगळं कस गोल गोल, धुराच्या वलयाबरोबर विरुन जात नसतं.

शेवटी ते एवढंच

माणसाने माणसांसारख जगायचं असतं

नाहीतर मग तो खलास होत जातो...


Rate this content
Log in

More marathi poem from Aman Shaikh

Similar marathi poem from Abstract