कधीकाळी
कधीकाळी
कधीकाळी आम्हीही....
केला होता प्रयत्न असा,
I love you म्हणताना तिला
गोठला होता माझा घसा.
तिच्या रूपाच्या जादूनं
घायाळ व्हायचं हृृृदय,
पाहून तिला मन क्षितिजावर
व्हायचा स्वप्नातील इंद्रधनुचा उदय.
कासावीस व्हायचा जीव
कधी खाली कधी वर,
गाणे व्हायचे शब्दांचे
आळवण्या प्रेमगीताचे स्वर...!

