STORYMIRROR

Subhash Kamble

Others

3  

Subhash Kamble

Others

छंद

छंद

1 min
243

छंद हा माझा रिझवी माझ्या मनाला,

आठवण तुझी गं, आज येते क्षणाक्षणाला.


भवताल दाटलेला अंधार कुट्ट काळा,

न जाणो काय ऊद्याचे ? लिहिले निशाच्या कपाळा.


संग्राम हा न संपणारा सारे विचार जायबंदी,

शोध माझ्या मनी तुझा गं, लक्ष हरवून गेली संधी.


घटका या बोचणार्‍या संपतील केंव्हा कशा गं,

त्रासून सारा हा जन्म का? जाईल असा फुका गं .


भेट मज एकदा अशी तू थोर सौभाग्य माझे,

पहाडापरि या दुःखाचे, जाईल विरून ओझे.


एकांत हा सरेल कंटाळून केंव्हाचा,

लाभण्या सौख्य, मेळ बसेल दोन जीवांचा.


Rate this content
Log in