STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

4  

Durga Deshmukh

Romance

कधी कधी

कधी कधी

1 min
280

भेटते सुख हे जीवनात कधी कधी

धोका देतात सावल्या उन्हात कधी कधी 


नजरेस नजर मिळतांना का वाटते लाज 

बोलतांना थकवा यायचा शब्दास कधी कधी 


भेटत नाही जागा नेहमीच ह्दयात या 

आठवणीत नसतांना येतो मनात कधी कधी 


जगणे अवघड आहे येथे एकट्याने

कळेल माझे प्रेम एकांतात कधी कधी 


हरवत चाललो आपण जगण्याच्या गर्दीत 

प्रेम खुलुन दिसते नयनात कधी कधी 


दुर्गा देशमुख 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance