काय आहे?
काय आहे?
बघ माझ्या डोळ्यात काय आहे?
प्रतीबिंब तुझं लाजरं आहे.....
जवाबदार बाळ ते गोजीरं आहे.....
मिटल्या ओठांचे गुपित ते ओठांनी नव्हे डोळ्यांनी हासरे आहे.....
बघ माझ्या मनात काय आहे?
जशी निलांबराची क्षितीजाशी मैत्री व्हावी.....
तशी तू माझ्यात दरवळावी.....
जशी दुधात साखर मिसळते,तशी तू माझ्यात विरघळावी.....
बघ माझ्या हातात काय आहे?
भविष्य आपल्या संसाराचे.....
तुझ्यासवे विश्व जिंकण्याचे.....
संसार भातूकलीचा राजा मी अन तुझे राणी होण्याचे.....

