काळजाचा तुकडा
काळजाचा तुकडा
ह्या काळजाची गोष्टही काही औरच आहे नाही!
बनलाय छोट्या छोट्या तुकड्यांनी.. अगदी छोट्या.. इवल्याश्या, नखांइतक्या !
काही तुकडे जुन्या न जुळलेल्या नात्यांचे, काही जुळून तुटलेल्या,
काही तुकडे टिकलेल्या नात्यांचे.. बरेचसे मायेच्या माणसांचे!
काही आठवणीतल्या जागेंसाठी तर खूपसे आठवणींचे!!
हळूहळू मनाचा एकेक तुकडा जोडणारं ते काळीज ...
सरतेशेवटी काय तर, ह्या सगळ्या छोटुकल्या तुकडद्यांनी भरलेले काळीच उरत असावे नाही का?
बहुधा त्यात एक छोटासा तुकडा माझाही असेल.... न जगलेला, न स्फुरलेल्या माझ्या स्वत्वाचा,
पण कायम काळजात एक तुकडा म्हणून नांदणारा!!
