STORYMIRROR

Omkar Pandav

Inspirational

3  

Omkar Pandav

Inspirational

काळास सांगा जन्मतः मी बंडखोर आहे

काळास सांगा जन्मतः मी बंडखोर आहे

1 min
238

काळास सांगा जन्मतः मी बंडखोर आहे

नियतीस यत्ने जिंकतो तो मी मुजोर आहे


नाही असा झुकणार या काळापुढे कधीही

लढणार जिंकण्यार्थ हा मी भांडखोर आहे


होईल सारा खाक मी जाणार पीळ नाही

स्वभाव ही माझा जसा मी एक दोर आहे


स्वतंत्र आम्ही जन्मतः वाऱ्यासमान ऐसे

ठेवील आम्हा मुठी कोणात जोर आहे 


आली तुफाने ही किती हलणार ना जरासा

रक्तात सह्याद्री कडा झुंजार थोर आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational