महाभारताचा कबूलीजबाब
महाभारताचा कबूलीजबाब


आयुष्य ते काय फक्त त्याग आहे ,
आत अश्रू सागर वर पहाड आहे ,
भोवती शतशत माझे परि एकटा अंतरी मी,
नाकबूल कधी कोणा भीष्म ही भावूक आहे
आयुष्य ते काय फक्त संघर्ष आहे,
वर अभेद्य कवच अंतरी अपमान आहे,
पुरुषार्थ ना जन्मतो कुळा पाहुनी कधी
नाकबूल कधी कोणा कर्ण ही विवश आहे
आयुष्य ते काय फक्त शर संधान आहे ,
नियती धनुर्धर मी मात्र बाण आहे ,
हातात माझ्या भेदणे लक्ष्य बाकी
नाकबूल कधी कोणा पार्थ असहाय्य आहे
आयुष्य ते काय फक्त द्वंद्व आहे
जगी वीर
ताच मात्र वंद्य आहे
वसुंधरा भोगणे जमते वीरास येथे
नाकबूल कोणा दुर्योधन बेलगाम आहे
आयुष्य ते काय हे मोह जाल आहे
सगळे अंध जगी अंधःकार आहे
धर्म तो एकची सर्वव्यापी सविता
ना कबूल कोणा धृतराष्ट्र गुलाम आहे
आयुष्य ते काय ऋण दान आहे
श्री चरणी शौर्य गुलाम आहे
जीवन वाटे तोच अंत निमित्त होतो
नाकबूल कोणा कृपण हा द्रोण आहे
आयुष्य ते काय कर्मयोग आहे
जे मिळाले न तो दैवयोग आहे
पवित्र ते सर्व कृत्य ध्येय धर्म ज्याचे
ना कबूल कोणा कृष्ण ही मनुष्य आहे