कागद
कागद
कोऱ्या पानावर शब्द लिहिताना
नाव तुझंच सुचतं
न राहता लिहितोही नाव मी
पण उगाच लिहिलं म्हणून
धूसपुसत राहतो स्वतःशीच
हरवून जातो आठवणीत
पाणी पडते जेव्हा डोळ्यातून कागदावर
तेव्हा बहाणाच मिळतो नाव खोडण्याचा हाताला
पेनाच्या घट्ट पकडीत
आपलेपणाची बनावटही सापडते
जशी तू शपथ घेतली होतीस
व्हॅलेन्टाईनला
राग राग करताना स्वतःचाच
कोपऱ्यात त्याच कागदाच्या चिटुऱ्या दिसतात
