जपत आहे
जपत आहे
हृदयात येऊन बघ अजून
त्याला तुझीच गरज आहे…
तू गेल्यानंतरही त्यात
तुलाच प्रेमाने जपत आहे…
तुझ्या आठवणींच्या स्पंदनांनी
हृदय हे जगत आहे...
तू गेल्यानंतरही त्यात
तुलाच प्रेमाने जपत आहे…
तुझ्या पाऊलखुणांच्या वाटेवर
अश्रू माझे हसत आहेत...
तू गेल्यानंतरही हसूत माझ्या
तुलाच प्रेमाने जपत आहे...

