ज्ञान गंगा तुझी, मैली होत आहे गं ....!
ज्ञान गंगा तुझी, मैली होत आहे गं ....!
म.ज्योती आई सावित्री शिक्षणाची
ज्ञान गंगा तुझी,
मैली झाली गं
शिक्षण देता देता शिक्षण घेता घेता...
अज्ञान दूर करता करता
म.ज्योती आई सावित्री शिक्षणाची
ज्ञान गंगा तुझी,
मैली होत आहे गं ....!
तुम्ही वाहिली ती त्या भूमीची जण कल्याणाची धुरा...
आम्ही त्या भूमीचे लेकरं आहोत...
ज्या भूमीत आधी हडप्पा संस्कृती होती
कसं खावं कसं राहावं कसं जगावं...
ज्यांनी जगासाठी माणुसकी जागून बीज
पेरली होती
जेथे तुकारामांन सारख्या आनेक
संतांचा सहवास होतं
छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म होतं
आई सावित्री तुज्या लेकीचा
सन्मान करणाऱ्याचा येथे घात होतं
लेकींना तूझ्या फाडून खाणाऱ्याचा येथे वाव्हा होतं
म.ज्योती आई सावित्री शिक्षणाची
ज्ञान गंगा तुझी, मैली झाली गं
शिक्षणातून अज्ञान दूर करता करता...
स्त्री चा पदर डोक्यावरून कांद्यावर आला
खांद्यावरून तो ओडणी रुपी तो गायब झाला
ओठा वर थोडसं खोटं
अन मनात जास्तीचं भरलेलं खोट
असचं देखणं रूप दिसतं झालं...
तुम्ही वाहिली ती त्या भूमीची जण कल्याणाची धुरा...
म.ज्योती आई सावित्री शिक्षणाचा...
शिक्षणात ओलावा राहिलाच नाही गं
वही अन पेन वापरणाऱ्याला...
पाटी अन पेन्शील किंमत राहिलीच नाही गं
आदी नसलेली घमेंडी नंतर तर येवू लागली गं
न विसरायच्या गोष्टी विसरू लागल्या गं
विसरायचा गोष्टी आठवणीत राहु लागल्या गं
म.ज्योती आई सावित्री...
कोणावर रागवायचं गं
सारे आपलेच आहेत गं...आई ...आई... ची
खरी शपत देऊन कसं
खोटं वागतात गं
आपल्या सोबत कोणी कसं वागलं म्हणून...
आपण पण तसं वागायचं का? गं
स्वतःच्या स्वाभिमानात दुसऱ्याचा
कसा विसरू लागले गं
दुरून बोलणारे झूठी माया...
करणारे आवडू लागले गं
जवळून काळजी करणारे न आवडते झाले गं
म.ज्योती आई सावित्री शिक्षणाची
ज्ञान गंगा तुझी,
मैली होत आहे गं ....!
अज्ञान रुपी राक्षसामुळे
ज्ञानच राक्षस झालं गं
आशुद्ध ज्ञान ज्ञानानी पण शुद्ध होणार नाही गं
तू पाजलेलं ज्ञानाचं ज्ञान अमृत,
अमृत प्राशन करून विष तयार करत आहेत गं
ज्ञान गंगा तुझी,
मैली होत आहे गं ....
चिखल गोळे तुझ्या पदरी
तुझं तुझी सेवा त्यांच्या पदरी
कसं विसरले गं तरी
ज्ञान गंगा तुझी,
मैली होत आहे गं ....!!!
