STORYMIRROR

Deepali Mathane

Classics

3  

Deepali Mathane

Classics

जिव्हाळा

जिव्हाळा

1 min
530

प्रेम जिव्हाळा आपुलकी

प्रत्येकाचा आधार असे

त्यातच गुंतून नाते अपुले

समाधानाने लाख हसे

   नात्याची वीण साजिरी

   जिव्हाळ्याने विणलेली

   कीतीही कर्तव्य भाराने

   दिसे न कधी शिणलेली

मोर पिस हे जिव्हाळ्याचे

रोमरोम फुलवित जाई

असे कुणी ही जाणीवच

आनंद सागरात नेई

   जिव्हाळा मनामनाचा

   करि शांत हा उन्हाळा

   आपुलकीची सावली धरूनी 

   करि त्रुप्त हा जिव्हाळा

प्रेमाचा वर्षाव तो

लावितो हा प्रेम लळा

मनाच्या गाभाऱ्यातच

उजळीतसे जिव्हाळा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics