STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Fantasy Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Fantasy Inspirational Children

जीवनातला खरा आनंद

जीवनातला खरा आनंद

1 min
226

जीवनातला खरा आनंद

फक्त शोधता आलं पाहिजे

स्वतःला चांगल्या कामात

गुंतता आलं पाहिजे....!!


निराधाराला आधार देवून

माणसात देव शोधता आलं पाहिजे

वृद्धांवर जिवापाड प्रेम करून

त्यांना हळुवार जपता आलं पाहिजे.....!!


दानधर्म, निःस्वार्थ सेवावृत्ती

मनापासून असली पाहिजे

वरवरच्या दिखाऊपणाला

थोडं बाजूला सारता आलं पाहिजे...!!


उन्हाळे, पावसाळे येतच राहतात

निसर्गावर भरभरून प्रेम करता आलं पाहिजे

मातीतच जन्मून मातीतच जायचं

हे लक्षात ठेवता आलं पाहिजे...!!


माय आणि माती अनमोल जीवनी

तीचं थोडंफार ॠण फेडता आलं पाहिजे

आकाशात कितीही उंच उडा पण

पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.....!!


चारचौघांतल्या मोठमोठ्या गप्पापेक्षा

चारचौघांच्या हृदयात बसता आलं पाहिजे

मोठेपणाला बाजूला सारून

एकमेकांच्या संकटात धावता आलं पाहिजे...!!


जीवनात भरभरून आनंद आहे

तो फक्त शोधता आलं पाहिजे

सुखदुःखाच्या वाटा तुडवीत

पुढे पुढे जाता आलं पाहिजे....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy