STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
216

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  जीवनाच्या प्रवासात

  धडपड जगण्याची,

  श्वास येतात-जातात

  धास्ती मनी टिकण्याची....


 प्रारब्धाने सारे सुख

 घेती लोळण पायाशी,

 तरी सैरवैर धाव

 जणू अशांती मनाशी.....


 जीवघेणा अट्टाहास

 मोह अनिष्ट मार्गाचा,

 कसा अधोगती नेई 

 क्षण लोभाचा,लोभाचा....


  टाळावेत क्षण असे

  धनी होऊनी पापाचा,

  समाधान चित्ती असे

  अट्टाहास कुमार्गाचा....


  आनंदाच्या ओंजळीत

  मनसोक्त पहुडावे,

  चार क्षणांच्या आयुष्या

  स्मरणार्थ पकडावे.....

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational