जग तू पण कधीतरी तुझ्या मनासारखं
जग तू पण कधीतरी तुझ्या मनासारखं
बेधुंदतेच्या शिखरावर चढून
बेफाम कोसळणाऱ्या लाटांसारखं
डोंगरात उगम पावून
खाली बेफिकीर वाहणाऱ्या नदीसारखं
गच्च भरुन येऊन
बेहद्द बरसणाऱ्या मेघासारखं
अलवार वाऱ्यासारखं तर कधी भयानक वादळासारखं
जग तू पण कधीतरी तुझ्या मनासारखं
हजारो रहस्य असणाऱ्या सागरासारखं
गर्दतेच्या किनाऱ्याला पोहोचलेल्या जंगलासारखं
बेबंद असणाऱ्या भावनांसारखं
जग तू पण कधीतरी तुझ्या मनासारखं...
