जाणार कुठे सोडून
जाणार कुठे सोडून
जाणार कुठे सोडून सांग
मनात तर मीच असेल ।
दूर जरी जाशील ना तू
सांग जरा मी कुठे नसेल ।
विचारात मी आचारात मी
स्वप्नात ही तर मीच दिसेल ।
नकोच आता विचार कशाचा
सुख दुःख तर तसेच असेल ।
