STORYMIRROR

सायली कुलकर्णी

Inspirational

2  

सायली कुलकर्णी

Inspirational

ईश्वराचे देणे

ईश्वराचे देणे

1 min
3.0K


कशाकशाचे देणे तुजला

देऊ करावे सांग जरा

एकेका श्वासाची किंमत

काय असावी सांग जरा

सुखात माझ्या सुख होऊनी

दुःखात ही तू वसशी इथे

नसानसातून तुझेच वाहणे

कसे दिसावे सांग जरा

ऊन सावल्या तुझ्याच आणि

तुझेच सारे वादळ वारे

मातीतुनही मोती काढशी

किमया तुझी रे सांग जरा

तुझ्याच उदरातून निपजती

फुले फळे अन् कंदमुळे

काय असावी किंमत त्यांच्या

वैशिष्ट्याची सांग जरा

कलाकार तू तुच घडवशी

सौंदर्याच्या कलाकृती

देऊ करावे कसे तुला रे

तुझेच वसणे सांग जरा

माझ्या ठायी तुझे च असणे

कसे दिसावे सांग जरा

या देहाचे मुल्य किती ते

‎कसे कळावे सांग जरा

दर्यातील या थेंबापरी मी

काय दान रे कुणा करावे

इथून सारे वेचुन घ्यावे

इथेच सारे सांडुन द्यावे

कृतज्ञता ही अशीच राहावी

नकोच देणे फेडायाचे

तुझ्याच कडुनी कमवायाचे

तुझ्याच चरणी अर्पायाचे.....


Rate this content
Log in

More marathi poem from सायली कुलकर्णी

Similar marathi poem from Inspirational