हो मी प्रेम केले
हो मी प्रेम केले
हो मी प्रेम केले
गुन्हा केला की गुन्हा झाला
मला माहीत नाही
पण मी प्रेम केले........
काय असते कसे असते
प्रेम मला कधी कळलेच नाही
असेल कळले तरी मन माझे
ईथे तिथे कुठे कधी वळलेच नाही
होता माझा नकार तिला
तरी तिने होकार दिला
गुन्हा केला की गुन्हा झाला
मला माहीत नाही....
असा कसा मी तिच्यात हरवलो
मला काही कळेच ना
गुंतलो कसा तिच्यात मी
मला काही उमजेच ना
प्रेम वेडे असते म्हणून
आधार तिने दिला
गुन्हा केला की गुन्हा झाला
मला माहीत नाही.....
नाही म्हटले तरी तिने माझे
ह्रुदय चोरले
नजरेने नजरेला बरोबर घेरले
गुंता झाला भावनांचा
तेव्हा तिने शिकवली प्रेमाची भाषा
गुन्हा केला की गुन्हा झाला
मला माहीत नाही......
माझे तिचे मन एक झाले
झाले ह्रदय एक आता
जुळले आयुष्य माझे तिचे
एकमेका बघता बघता
शतजन्माची सोबती होण्यास
तिने हातात हात दिला
गुन्हा केला की गुन्हा झाला
मला माहीत नाही
हो मी प्रेम केले.....

