हिवाळा
हिवाळा
हुडहुडी भरते दात लागे वाजू
मऊमऊ दुलईत रात्रभर निजू…
हळूहळू थंडीला चढतो जोर
ऊबदार बंडीत लहान-थोर…
शेकोटी मग खासच पेटते
हिवाळा आल्याचे सांगत सुटते…
पाना-फुलांवर दव हे पडते
धुक्यात आपली वाटही अडते…
रात्र होते मोठी दिवस लहान
दर्शन द्यायला सूर्य घेतो मान…
निसर्ग सारा येतो खुलून
आकाश भेटते रूप बदलून…
आल्हाददायक उत्साही वारा
ऊर्जावान ऋतू हाच आहे खरा