STORYMIRROR

Kishor Bujade

Inspirational

4  

Kishor Bujade

Inspirational

हिरवचं रहायचं..!

हिरवचं रहायचं..!

1 min
197

नजरेसमोर होतं विस्तीर्ण पसरलेलं रान...उरले होते हिरवळीच्या रंगाचे काही ठिपके...


आकाशातील नीरव शांतता कुणाच्या तरी शोधात दिसली..

डोंगर माथ्यावर हळूहळू सरकतांना दिसला..

आगीने लालबूंद निखारा झालेला तो सुर्य....


पाखरांचे थवे मात्र दिसत नव्हते या आतुरलेल्या डोळ्यांना...

शोधून शोधून थकलो पण, खरे कारण कळलेच नाही...

मी मात्र माझ्या कल्पनेची पाखरे सुसाट सोडली होती....

मुक्त नभात विहारण्यासाठी....


तेव्हा दिसल्या मला...पिक काढल्यानंतरच्या..निपचित उभ्या...

वाळलेल्या....तुराट्या...हातापायाच्या अचानकच फुगल्या होत्या नाड्या...

एका क्षणात भानावर आलो.


हिरवं...रहायचं...हिरवचं रहायचं...हिरवं असे पर्यंतच असते किंमत...अस्तित्त्वाची....!


नाहीतर चुलीत जाळल्या जातो...राख होते...ती ही वा-यावर उडून जाते.

..वीज कडाडून चमकावी तसाच चमकला विचार....माझ्या अंतर्मनात..!

हिरवचं रहायचं...!!!


थोडं पुढं गेल्यावर...दिसला मला एक पळस...!

वैशाखाच्या तप्त उन्हात बहरलेला...हिरव्यागच्च पानांनी...

फुलांनी...लदबदलेला...वैशाखाच्या वनव्यात जळुन सुद्धा

ताठ मानेने नभाकडे पाहनारा....हसुन उन्हाचे चटके सोसणारा...हिरवाकच्च...!!


आपण हिरवंच रहायचं....

उन्हातही खळखळून हसायचं...!!


चालता चालता टोचला मला...एक हिवराचा काटा....

चटकन लालबूंद रक्त आलं तळपायातून...काटा काढल्यावर दिसला

तो ही हिरवाकच्च...निरखून पाहिलं तर झाड दिसलं हिवराचं...एकाच रंगानं एकरुप झालेले...

बुडापापपसून...शेंड्यापर्यंत कोवळं ...हिरवंकच्च...!


आपण हिरवचं रहायचं....!


थकून बसलो मी एका वाळलेल्या कापलेल्या बाभळीच्या ओंडक्यावर...

टचकन विचार आला...हिरवा असता तर डौलात उभा असता..

लोकांनी वापरला नसता...

सरणावर ठेवला नसता...

मरनात जाळला नसता...


आपण हिरवचं रहायचं...!

आपण हिरवचं राहायचं..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational