STORYMIRROR

Kishor Bujade

Abstract

3  

Kishor Bujade

Abstract

वादळ...वारा...झुळूक...!!

वादळ...वारा...झुळूक...!!

1 min
223

वादळ...वारा...झुळूक...!

ती रांगत रांगत आली

श्वासांशी समरस झाली

उचलून श्वास मग काही

ती पांगत पांगत गेली


झुळकेचा झाला वारा

उरला न तयाला थारा

विस्कटून आठवनींचा

तो सुटून गेला भारा


डोळ्यांच्या सामोरी क्षण

मग घिरट्या घालीत होते

श्वासांचा पाला पाचोळा

मन पकडत झेलत होते


वा-याची झाली वावटळ 

नभ गरगर फिरले होते

मातीत मनाच्या तेव्हा

कण थरथरलेले होते


ती सरकत पसरत गेली

मी घासत ओढत गेलो

दशदिशात चिंध्या सा-या

मी पकडत उचलत गेलो


वा-याचे झाले वादळ

मन पिसाटलेले घोडे

ते पहाड थक्क जाहले

वृक्षांना पडले कोडे


ढग सैरवैर झालेले

सागरात उठल्या लाटा 

पायाशी घालत पिंगा 

आल्या थकलेल्या वाटा


मी थकून गेलो होतो

वादळ ही शमले होते

वारा ही मंद जाहला

झुळकेला कळले होते


क्षण हरवून गेले काही

मी पुन्हा बांधला भारा

श्वासांशी भांडत गेला

तो झुळझुळणारा वारा


ती सांगत बोलत आली

श्वासांशी समरस झाली

कानाशी गूज स्मृतींचे

ती सांगत सांगत गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract