हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
तहान भूक हरवली
प्रीत मनी जागली,
सतत तुला पाहण्याची
ओढ मनी लागली
पाने फुले वेलींचा
स्पर्श भासतो नवा,
बहरला हा आसमंत
अन् मोहरली हवा
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
नव्यानव्या प्रेमाची
माझी नवी आस तू,
माझ्या ह्या देहातील
प्राण तू अन् श्वास तू
जाणवते चेतना
मखमली त्या स्पर्शाने,
भान हरपते तुझ्या
मंदधुंद श्वासाने
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
आस तू अन् श्वास तू
जगण्याचा ध्यास तू,
प्रेमाने भिजलेल्या
मातीचा वास तू
गोड तुझ्या हसण्याने
उठती ह्रदयी तरंग,
इंद्रधनू ही लाजे
बघूनी तुझे रूपरंग
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
नयनात स्वप्न तुझे
नाव तुझे ओठी,
व्याकुळतो प्राण हा
तुझ्या भेटीसाठी
जगण्याला अर्थ नवा
मज प्रेमाने दिला,
सृष्टीतील सुंदरता
आज उमगली मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला
प्रेम म्हणजे सृष्टीतील
सुखद अशी भावना,
अनुभूती घेता क्षणात
स्पर्शली माझ्या मना
होऊनी पक्षी आता
ऊडतो गगनात मी,
भेटली मजला माझ्या
स्वप्नातील सुंदरी
हे काय जाहले मला
हे काय जाहले मला

