हाहाकार पावसाचा
हाहाकार पावसाचा
असूनही आवडता
जलचर ह्या सृष्टीचा
किती रे तू माजविला
हाहाकार पावसाचा
असा कसा तू पर्जन्या
गरजेला नसतोस
आली आता दिवाळी ही
परतणे टाळतोस
सहवेना तुझा त्रास
किती अंत पहायाचा
कसे म्हणू तुला त्राता
हाहाकार पावसाचा
बस कर तुझा खेळ
परतण्या झाली वेळ
तुझ्या या वागण्याने
कधी सुखी होई मेळ
गेला संसार वाहूनी
मेहनत गेली वाया
मूर्ती पण न राहिली
कसे पडू देवापाया
एक विनवणी आता
हेच एकच मागणे
संयमाने वाग जरा
कर सुखाचे जगणे
