STORYMIRROR

Dnyaneshwar Sirsat

Inspirational

3  

Dnyaneshwar Sirsat

Inspirational

गुलामगिरी

गुलामगिरी

1 min
427

गुलामगिरी म्हणजे श्रमिकांचे शोषण

कुणाचीतरी माणसे हीच मालमत्ता 

धाक बळाचा सदैव वापर करून 

श्रमिकावर गाजवत असे हे राजसत्ता 


विकले जाई इच्छेविरुद्ध गुलामांना 

नसे अधिकार काम सोडून जाण्याचा 

बोलता येत नसे कामास नकार देण्याचा 

नसे उजागिरी काम मोबदला मागण्याचा


कायद्यांतर्गत नोकरावर होतसे अन्याय 

वाचा फोडणाऱ्यांना डांबले जाई तुरुंगात 

गुलामीच्या जखडात बांधून ठेवून 

श्रमिकांचे आर्थिक शोषण करी अतोनात 


वापर होतसे मुलांचा सैनिक, दहशतवादी 

मज्जावाने बायका मुलांचे होई लैंगिक शोषण 

अन् स्त्री-पुरुषांची होई आयात-निर्यात 

पिसाटलेल्या धर्ममार्तंडाचे होई मात्र पोषण 


इथल्या शोषित पीडितांनी पेटविली मशाल 

श्रमिक वर्गाने केला सत्तेविरूद्ध एल्गार 

एकतेच्या ताकतीने बंद झाले उद्योग 

इथल्या भांडवलदारांनी घेतली माघार 


द्या करून गुलामांना गुलामीची जाणीव 

उच्च ध्येयाप्रती एकच मंत्र आहे शिक्षण 

अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्ध 

सुंदर आयुष्यासाठी शिक्षणच करी रक्षण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Dnyaneshwar Sirsat

Similar marathi poem from Inspirational