STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

3  

Shobha Wagle

Tragedy

गरज लैंगिक शिक्षणाची

गरज लैंगिक शिक्षणाची

1 min
207

तंत्रज्ञानावर चालले युग आजचे 

एका क्लिकवर माहिती गुगलवर

म्हणून सगळा माजलाय गोंधळ

लैंगिक शिक्षणाचा भार शिक्षकांवर.


सज्ञान आहेत आजचे पालक

मुलगा मुलगी समान मानत

आई शिकवत असते मुलीस

तसे वडिलांनी मुलास जावे सांगत.


शिक्षक व्हावे पालक देण्या ज्ञान

शरिरातले बदल अगोदरच सांगावे

होतील मुले सतर्क तया बाबत

अचूक ज्ञान पालकांकडून मिळावे.


मुलगा मुलगी सावध होतील

अत्याचार, विकृतीला आळा बसेल

स्वयं रक्षणास असतील सक्षम

वाईट नजर मुलगा मुलगी ओळखेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy