घुंगरु
घुंगरु
मी सोडून सारी लाज
अशी मी नाचते आज
पाय थिरके हो कि मन माझे झुलते हो
घुंगरू वाजतय हो कि घुंगरू वाजते हो,llधृ,ll
सजले अशी मी नार
करुन साज शृंगार
नाचे फुले दरबार
राया वेड लावी फार
अर्ध्यात लचकला पाय ताल धरते हो
घुंगरू वाजते हो कि घुंगरू वाजते हो ll१ll
गोरी गोमटी ही काया
तुम्हा साठीच हो राया
नका वेळ घालू वाया
अशी करा तुम्ही माया
उचलून घ्या मज कि घुंगरू तुटलय हो
घुंगरू वाजतय हो कि घुंगरू वाजतय हो ll२ll

