STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Tragedy Fantasy Inspirational

3  

Abhijit Deshmukh

Tragedy Fantasy Inspirational

घेऊयात उंच भरारी

घेऊयात उंच भरारी

1 min
325

आपण घेऊयात,

उंच भरारी।

पडू दया दू:खाच्या,

कितीही सरी........॥धृ ॥


कोणतेही क्षेत्र असावे,

बोली असावी खरी।

मुला-मुलींना सांगा,

तूम्ही बना कष्ट-करी....॥१॥


मदत करायला येणार,

नाही कोणती परी।

स्व-बळावर तू,

परिवाराचे पोटभरी....॥२॥


जाऊ नकोस तू,

कोणाच्या दारी।

या जगात एकच,

शक्ती ती आहे नारी....॥‌३॥


तू नको जाऊ यशा पासून ,

रे आता माघारी।

तू पूढे घेऊन जाय,

प्रगती-कडे दुनिया सारी....॥४॥


आता येईल प्रत्येकाची,

जिंकण्याची बारी।

तू कर आनंदाने,

यशावर स्वारी....॥५॥


तू ठेव फक्त,

मनाची तयारी।

तू आनंदाने घेरे,

सर्वात उंच भरारी....॥६॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy