गैरसमज
गैरसमज
अर्थाचे अनर्थ न व्हावेत
म्हणून कसं आता बोलावं
बोलण्याआधी शब्दांना ओठांवर
किती आता तोलावं
भार घेऊनी संकोचाचा डोई
कसं स्वच्छंदी डोलाव
कि फेकावे गैरसमजाचे भार एकदाचे
अन् मुक्तपणे मन खोलावं
सुख दुःख जाणूनी तुझं सारं
थोडं माझंही पान खोलावं...
