STORYMIRROR

SANIKA KADAM

Inspirational Children

3  

SANIKA KADAM

Inspirational Children

एप्रिल महिनो सरलो...

एप्रिल महिनो सरलो...

1 min
245

एप्रिल महिनो सरलो

तरी गाडयेचा तिकिट काढूक नाय

मी पण गावाक जातलय असा 

अजून कोणाक सांगूक नाय😔


संध्याकाळी गाडयेत बसान 

सकाळी गावात उतराचा हा

वाफ्यातून वाट काढीत 

धावत घरात जावचा हा🏃


मागच्यावर्षी सारख्या माका 

लाल मातीत खेळूचा हा

बावडेवरचा पाणी काढून 

माका आंघोळ करूची हा


कणकवलीत गेल्यासारखा

कटवडोही खावचो हा😋

घुंगरांचो आवाज ऐकून माका🎋

ऊसाचो रस पिऊचो हा


एसटीत बसून माका बरोच

प्रवास करुचो हा

गरम गरम चायवांगडा 

घावनो माका खावचो हा☕


मित्रांसोबत माळावर जाऊन 

क्रिकेट माका खेळू चा हा

सगळ्यांका आऊट करून 

शतक पूर्ण करूचा हा 😎


बारके बारके दगड मारून 

आंबो माका पाडूचो हा

फणसाच्या भाज्येवांगडा

आंब्याचो सार घोटूचो हा😋


वाडयात बांधलेल्या वासरांसोबत

भरपूर माका बोलाचा हा

झोपाळयावर बसून माका

 पेलोभर पेज पिऊची हा😊


उन्हातानातून माळांवरना

नुसताच माका भटकूचा हा

नदीवर जाऊन डुबकी घेऊन 

पाण्यांत पेऊन येवचा हा


चूलीवर रांदलेल्या माश्याचो सार

भाकरी सोबत चाखूचो हा🐟

देवचाराची गोष्ट ऐकत 

खळयात माका झोपाचा हा


पाटल्यादाराक काजी भाजताना

बरको गरो गिळूचो हा 

म्हणूनच म्हणतंय आये माका

ह्या वर्षी गावाक जावचा हा😉


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational