दिवस होते ते
दिवस होते ते


भान हरवायचे दिवस होते ते
मनातले मागायचे दिवस होते ते
कितीही उशीर झाला तरीही
वाट पाहण्याचे दिवस होते ते
न मागतही मिळायचे सारे
लपून छपून भेटायचे दिवस होते ते
नजर नजरेला भिडायची अचानक
अलगद बिलगायाचे दिवस होते ते
भान हरवायचे दिवस होते ते
मनातले मागायचे दिवस होते ते
कितीही उशीर झाला तरीही
वाट पाहण्याचे दिवस होते ते
न मागतही मिळायचे सारे
लपून छपून भेटायचे दिवस होते ते
नजर नजरेला भिडायची अचानक
अलगद बिलगायाचे दिवस होते ते