STORYMIRROR

Santosh Chavan

Romance Tragedy

3  

Santosh Chavan

Romance Tragedy

गेले भेटायचे राहून

गेले भेटायचे राहून

1 min
228

कित्येक पावसाळे झाले, गेले भेटायचे राहून

ये फिरून माघारी, आलय आभाळ भरून


वाट पाहून तुझी, गेली अर्धी जिंदगी

एकट्याने चालतो आहे, जाईल वाटही सरुन


ते दिवस वेडे, होते काही औरच

स्मरताना पुन्हा एकदा, डोळे येतात भरून


आठवण येते तुझी, हर एक दिवशी

दिवस ढकलतोय मी, तुझी तसविर पाहून


विसरली असशील मला, तू त्याच वेळी

आठवण येते का सांग, माझी राहून राहून


आठवण आलीच जरी, नको त्रास घेऊ करून

उगाच त्रास कशाला तुला, घे कामात वाहून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance