दिवाना
दिवाना
तुझेच आहेत सारे मजनू
घायाळ हास्याने तुजिया
रोजच करतात विनवणी तुला
एक कटाक्ष देण्याची
कुणी आणती नजराने फुलाचे
कुणी आणली माणिक मोती
मी मात्र फकीर धनाचा
मज जवळ फक्त प्रेमाची महती
असाच आहे तुज मजनू
तू पाठमोरी वळून पाहत
हरपून जातो हा दिवाना

