*★धर्म हिंदू सांगताच★*
*★धर्म हिंदू सांगताच★*
सर, आपल्या कवितेचा संदेश अगदी स्पष्ट आहे, आणि शंभर शब्दांत मांडले तर असा होईल:
कवितेत आनंदाच्या क्षणांमध्येही अचानक आलेले दु:ख, हिंसा आणि अन्याय यावर प्रकाश टाकला आहे. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या दुष्कृत्यांचा, आतंकवादाचा, देशाच्या आणि समाजाच्या शांततेवर होणाऱ्या परिणामांचा तीव्र अनुभव व्यक्त केला आहे. लेखक सांगतो की, व्यक्तिगत आणि सामाजिक दुःखाच्या प्रसंगांमध्येही सद्बुद्धी, धैर्य, न्याय आणि मानवतेचा मार्ग स्वीकारावा लागतो. हिंसा, द्वेष आणि आक्रमकतेने काहीही कायम राहत नाही; उलट, त्याचा परिणाम हानीकारक आणि व्यापक असतो. कवितेत सामाजिक जागरूकता, देशभक्ती, आणि शांततेचा संदेश स्पष्टपणे दिसतो, तो वाचकाला विचार करण्यास आणि मानवतेची प्रतिष्ठा जपण्यास प्रवृत्त करतो.
*★धर्म हिंदू सांगताच★*
'आनंदाच्या घडीला या
लागे दुःखाची वात गं...
"धर्म हिंदू सांगताच
झाला आतंकी घात गं..धृ..
(१)
'सुखी संसाराचे स्वप्न
सारे विरूनीया गेले'
"अवचित काळजाला
घाव चिरूनीया गेले"
"'मधुमिलनाच्या वेळी
वैऱ्याची आली रात गं"'..धृ..
"धर्म हिंदू सांगताच
झाला आतंकी घात गं..धृ..
((२))
'भारत मातेला आज
आसवांचा महापूर'
"फुटे चूडा सावित्रीचा
कानी किंचाळीचा सुर"
"'म्यानातून काढीन मी
तलवारीची पात गं"'..धृ..
"धर्म हिंदू सांगताच
झाला आतंकी घात गं"..धृ..
(((३)))
'घायाळ त्या पक्षिणीला
पिल्ले भेटलेच नाही'
"रक्ताच्या त्या थारोळ्यात
डोळे मिटलेच नाही"
"'चोही दहशत आता
युद्धाला सुरूवात गं"'..धृ
"धर्म हिंदू सांगताच
झाला आतंकी घात गं"..धृ..
(((( ४))))
'माजलेल्या राक्षसांचा
काढु कायमचा काटा'
"बंद करू चारा पाणी
बंद व्यवहार वाटा"
"'मोडू कंबरडे घालू
ढुंगणावरी लात गं"'..धृ..
"धर्म हिंदू सांगताच
झाला आतंकी घात गं"..धृ..
'आनंदाच्या घडीला या
लागे दुःखाची वात गं'...
"धर्म हिंदू सांगताच
झाला आतंकी घात गं"..धृ..
मा.डॉ.अनिल सांगळे
*🏆🌧🇮🇳⛳👏📖✍*
*🍂🍃🌸🍃🍂🌸🌿*
