देशद्रोही
देशद्रोही
नौटंकी करणारे देशद्रोही
माथा भडकवणारे षंढ आहेत।
प्रस्थापितांपुढे सारे कसे कूंड झाले
विषमतेचे विष पेरणारे कडवे आहेत ।
कुठे गेले मी म्हणणारे,
छाती फुगवून सांगणारे,
हातात रंगीबेरंगी झेंडे घेऊन
रस्त्यावर घोषणा देणारे ।
आहेत कुठे?
अन्याय झाल्यावर रस्त्यावर उतरणार
आहेत का?
घटना घडून गेल्यावर सहानुभूती
दाखवणार आहेत का?
तोपर्यंत सारं शांत झालेले असेन
काहीच घडलं नाही, असे वाटेन,
त्यानंतर
नेते जागे होणार, झोपेतून उठल्यागत
ओसाळलेले चेहरे घेऊन,
चौकात घुसणार, तोडफोड करणार
अॅट्रॉसिटीचा धाक दाखवून, माघारी
फिरणार
नौटंकी करणारे देशद्रोही
खरोखर माथा फिरवणारे षंढ आहेत