STORYMIRROR

Sangita Pandirkar

Inspirational

4  

Sangita Pandirkar

Inspirational

दैवत मुलींचे - सावित्रीबाई फुले

दैवत मुलींचे - सावित्रीबाई फुले

1 min
419

सावित्रीच्या लेकी आम्ही 

सांगतो अभिमानाने जगाला 

हे दिवस नसते आले आमचे 

खात्रीने सांगतो तुम्हाला 


चिखल शेणाचा मार खाल्ला 

अपमानही सहन केला 

पण सोडला नाही ध्यास तो 

आम्हा मुलांना शिकवण्याचा 


ज्योतीबा खंबीर उभे पाठीशी 

शिकविले त्यांनी सावित्रीला

तशीच सावित्री खंबीरपणे 

ज्योतीबांच्या निश्चयाला


तोडून दिली बंधने सारी

तोडीले सामाजिक फास 

त्या सावित्रीने धरला 

फक्त शिक्षणाचा ध्यास 


मुलगी शिकेल प्रगती होईल 

ही जाण होती सावित्रीला

त्यासाठी तिने झिजविले 

आपल्या सार्या आयुष्याला 


ना बाळगली तमा कोणाची 

ना रडली ती कशाला 

ध्येय ठेवून डोळ्यासमोर महत्त्व दिले मुलींच्या शिक्षणाला 


धन्य ती सावित्री 

धन्य ते ज्योतीबा

देवापेक्षाही पुजतो आम्ही मुली 

त्या महान दांपत्याला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational