छावा...
छावा...
धार्मासाठी प्राण दिला ,
रयतेला देऊन दुवा ...
स्वाभिमान तेजस्वी नवा ,
चेतवला होऊन दिवा ...
हालअपेष्टांना हरवुनी,
जिंकवला गनिमी कावा ...
औरंग्याला पाणी पाजुनी ,
स्वत:च झाला भगवा ...
धैर्याचा शौर्याचा पाठी ,
उरून राहिला ठेवा ...
शत्रूही करतील हेवा असा ;
मृत्युंजय झाला छावा ...!!!
