STORYMIRROR

Swamini Munagekar

Others

3  

Swamini Munagekar

Others

पाऊस...!!!

पाऊस...!!!

1 min
265

दारी पाऊस नाचतो ;

होती थेंबांचे पैंजण ...

नव्या सुखांत भिजतं ;

पारिजाताचं आंगण ...


भुई लपेटून घेते; 

ऊन्हासोन्याचं चांदणं ...

इंद्रधनू अंबराचं ;

होतं मिश्कील हासणं ...


नदी शोधत धावते ;

कृष्णमेखल्यांचं लेणं ...

पावा हवेचा ऐकत ;

पक्षी गाती गोड गाणं ...


झिमझिम त्या सरींचं ;

चिंब करी येणं -जाणं ...

फक्त उरलंय आता ;

जिवाचं मोरपीस होणं ...!!! 


Rate this content
Log in

More marathi poem from Swamini Munagekar